सहज मी...


Best way to put it : Please don't find any references while reading. Sometimes fun value.

Done it long time back ( now check the year one would know when was it done ) . Used to write "Marathi" articles ,was editor and did things for magazines Seattle Maharashtra Mandal, was on SMM committee 2005 Vice President, editor / 2006 editor, 2007 BMM convention Seattle and some places and initially blog was open, things were published in magazines plus some other sites etc, then I just made it private, new year with old plus new .. (મરાઠી , ગુજરાતી.. Marathi, Gujarati, some other)

Friday, September 14, 2007

लकी चार्म

काल सकाळी स्नेहाचा फोन आला .. 'घरी आहेस का?'; म्ह्टलं, 'हो, का गं?
म्हणाली 'मी पाच मिनिटांत पोचते', म्ह्टलं 'बरं'.
तिच्या या अशा अचानक आलेल्या फोननी मी जरा गोंधळूनच गेले होते. मनातच म्ह्टलं 'काय झालयं कुणास ठावुक, आल्यावर विचारीन...'
ती आली, सगळं घर रिकामं असताना तिच्या नेहेमीच्या ठरलेल्या जागी जाऊन बसली.
मी विचारलं 'काय झालं?"
म्हणाली मी इथे फक्त शांत बसायला आली आहे, काही विचारु नकोस.

जाताना फक्त एवढचं म्हणाली 'तुझ्या इथे आल्यावर घरी आल्यासारखं वाटतं, इथे आल्यावर मला डिसीजन घ्यायला सोप जातं"

झालं ती घरि गेली सुद्धा. पुढचे सगळे दिवस जणु काही झालचं नाही अस तिच वागणं.
------------------------------------

आपल्या सर्वांचा एक कंफर्ट झोन असतो [आपण मानलेला, बनवलेला, किंवा असलेला] जिथे जावुन आपली पोझीटिव्ह विचार शक्ति वाढते, निदान आपल्याला तरि असं वाटत असतं . हे खरंच असं असतं का मानसिक असतं हे ठावूक नाही पण प्रत्येक व्यक्तिची एक खास जागा, वस्तु, असं काही तरि असतं ज्याला कधी कधी लकी चार्म असं आपण म्हणतो, ज्यामुळे आपण जे काही करु ते खात्रीने चांगलेच होणार असा आत्मविश्वास आपल्यात येतो. कदाचित आपणच आपल्याला आधार कसा द्यावा यासाठी आपल्याच मनाने बनवलेली ही एक सोय असेल.

Thursday, September 13, 2007

ती......

कधी निखळ ह्सणारी, कधी अंतरमनाला हलवणारी, कधी खुप विचारी बनवणारी, लागेल तेंव्हा धीर देणारी, काही नाही विसरुन जा असं समजावणारी 'ती'...
तुमच्या आपल्या सर्वांमध्ये वावरत असतेच...
वाट बघत असते कधी मी मुक्त विहार करीन याचा...तिला बाहेर यायची खुप इच्छा तर असते, पण न येण्याचीही तितकीच कारणं असतात....
काहीच जमलं नाही तर मग एकटीच बसून राह्ते मनाच्या एका कोप~यात...
सुटकेची वाट पहात.....
याचा अर्थ ती खुप असहाय आहे असंही नाही...
कधी कधी ती स्वत:हूनच हा मार्ग स्विकारते, छान वाटत थोडस आपल्यातच राहणं...
आपण मात्र गरजेच्यावेळी फक्त 'ती'ला हाक मारतो. पण 'ती' मात्र एखाद्या विश्वासु मित्रासारखी आपली नेहेमीच मदत करते...

पाऊस


पाऊस असं नुसतचं म्ह्टलं तरी वा~याची एक झुळुक अंगावरुन गेल्यासारखं वाटतं. भारतातल्या पावसाचं काही निरळचं असत. पाऊस येणार अस सांगणारा ढगांचा काळोख, जोरदार सुटलेला वारा, अग दोरीवरचे कपडे काढ ह्या हाका, गच्चीत काही ठेवलय का? एवढं म्हणेपर्यंत पडणारे सुरवातीचे टपोरे थेंब आणि त्यांबरोबर सुटलेला मातीचा सुगंध; सियाटलमध्ये तो कितीही प्रयत्न करुन मिळत नाही. कसं आहे ना, ग्रुहीत धरलेल्या गोष्टी नाही मिळणार हे कळल्यावर किती बेचैन होतं.

पहिला पाऊस असेल तर रस्त्यावर लोकांची होणारी तारांबळ आपण सगळ्यांनी अतिशय मजेनी पाहीली असेल. धावत धावत दुकानाचा आसरा घेणारे काही व त्यांच्याबरोबर आडोशाला आलेली कुत्री आणि मग कमीत कमी जागेत एकमेकांना न चिकटता पर्स, साडी आणि हातातलं सांभाळणा~या. उलटी झालेली छत्री सरळ करण्यात आपण भिजतोय हे विसरलेले काही, नेमका पाऊस जोरत आलाय आणि संध्याकाळी ट्रेन्स लेट झाल्या आहेत आता आपला मुलगा / मुलगी घरी कधी आणि कशी येईल या विचारांनी गैलरीत वाट बघत बसलेली आई. शाळेसाठी नवीन रेनकोट, गमबूट खरेदिसाठी उत्सुक चिमुरडी. गरम गरम बटाटेवडे खाण्यासाठी वडापाव सेंटरमध्ये झालेली गर्दी. शी ग बाई! त्या मंडईत किती घाण आणि कचया॓चा वास आहे, चिखलात भाजी आणायला नको वाटतं असं म्हणत खरेदि करणा~या बायका. काय गं, भाजी एवढि महाग ? असं विचारल्यावर नाशिकला खुप पाऊस झाल्यामुळे नुकसान झालं असं दर पावसाळ्यात उत्तर देणारी भाजीवाली हे सगळं आपण सर्वांनीच अनुभवलेलं.

पावसात समुद्र बघायला खुप मजा मग तो वरळीला असो, गेट वे औफ़ इंडीया असो किंवा अलिबागचा असो ते उसळ्णारं पाणी भल्या भल्यांच्या मनात धडकी भरवायचं. बच्चेकंपनी दिसेल त्या डबक्यात कागदाच्या होडया करुन सोडण्यात गुंग असायची. काही टारगट पोरं मुद्दाम अंगावर पाणी उडवायची. सर्वात जास्त मजा रिक्षा किंवा पाणी भरलेला ट्रक खड्डयातून जाताना असायची आणि मग म्युनिसीपालटीच्या कृपेने 'रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते' असं म्हणायची वेळ यायची.

भारतात, सगळ्यांनीच नोटीस केलयं का माहीत नाही, पण पावसाची वातावरण निर्मीती खुप छान असते. सरळच म्हणायच तर संध्याकाळी ६.०० वाजता विविध भारती रेडीओवर लागणारी सर्व गाणी पावसाची.... घन घन माला, आला पाऊस, घनं ओथंबून येती, नभ उतरु आलं, गारवा हे मिलींद इंगळेनी गायलेलं गाणं, ते सर्जा पिक्चर मधलं गाणं आत्ता मला आठवत नाही पण नेहेमी लागतं. मग चालु व्हायची लहान मुलांची गाणी सांग सांग भोलानाथ, वगैरे. एफ. एम.च्या जमान्यात म्हणजे आम्ही कौलेजमध्ये असताना 'बोस्को टुनाईट' असा काहीतरी कार्यक्रम लागायचा त्यात तुम्ही कोणालातरी गाणं डेडीकेट करु शकत होतात. तेंव्हा ईंग्लीश रोमांटीक गाणी लागायची, पाऊस हा नेहेमीच प्रेमळ भावत यायचा. आता रेडीओ मिर्ची जमान्यातही त्याच स्वरुप काही वेगळं नाही.

आपल्या सर्वांना हा अनुभव नक्कीच असेल पावसात का कुणास ठावुक लोकं खुप मदत करणारी बनतात; मग ते ट्रेन्स मध्ये असो किंवा तो गावाकडे आलेला पूर असो किंवा कुठेही कोणीही अडचणीत असोत, बहुतेक पाऊस स्वभावातही प्रेमाबरोबर गारवा घेऊन येतो.

पाऊस आला की पुणे मुंबई प्रवासाला खुप मजा यायची. आत्ता हायवेमुळे गावं जवळ आली पण ती मजा गेली. बदलापुर पासून हिरव्यागार टेकडया दिसणं चालु व्हायचं, कर्जत आलं की गरम बटाटेवडे आणि चहा घ्यायला ही गर्दी, मग पुढच्या सर्व प्रवासात निसर्गाचच साम्रज्य दिसायच. लोणावळा खंडाळा परिसरात घाटात दिसणारी माकडं, असंख्य धबधबे, त्या ओल्याशार गवतावरुन गाल फिरवावा असं वाटण्या इतपत सुंदर मऊ मखमली हिरव्या गच्च टेकडया, वा~यामुळे खिडकीतून अंगावर येणारे पाण्याचे शिंतोडे, बोगद्यातून जाताना अंधाराचा होणारा परिसस्पर्श. एक सुखावणारा अनुभव. रेल्वेमधलं आम्लेट इतर कधीही एवढं चांगलं लागलं नसेल.

या दिवसांत सहलीला एक आगळीच गंमत येते. आम्ही मैत्रीणी बदलापूर डैम, कोंडेश्वर, नेरळ, झेनीथ फौल्स, बारवी डैम, भंडारदरा धरण, अलिबाग, माळशेज घाट अशा ठिकाणी मजा करायचो. पुण्याला गेल्यावर हमखास सिंहगडाची फेरि व्हायची आणि लांबची म्ह्टलं तर भिमाशंकरची. धुंवाधार पाऊस, घाट, असंख्य धबधबे, दुथडी भरुन वाहणा~या नद्या, वाटेवरची गावं, हिरव्या कमानी केलेली रस्त्यावरची झाडं, डोक्यावर इरलं घेऊन शेतात पेरणी करणारे शेतकरी, रस्त्यातले धाबे, उन पावसाचा चाललेला लपंडाव, असे प्रवासातले असंख्य दुवे हरवलेल्या गोष्टींची वारंवार आठवण करुन देतात. भारतातल्या प्रवासात वाटेत कोणीच दिसत नाही आणि आपणच चाललोय, सर्व दुकानं बंद अस चित्र कधीच दिसत नसेल. तीच एक तिथली गंमत आहे.

असा हा पाऊस जसा तहानलेल्या मातीला नवजीवन देतॊ तसाच शिणलेल्या मनाला गारवा देतॊ. काल श्रीधर फडक्यांच 'ऋतु हिरवा ऋतु बरवा' हे गाणं ऐकताना सहज सुचलं म्हणून लिहीलं. मग कशी काय वाटली भारतातली पावसाळी यात्रा? तुम्ही पण आठव्णींत नक्कीच चिंब भिजला आसाल!

Published in SMM 2006 magazine SARATHI [ well I wrote it uder "Paus" and u might find "Rutu hirava" title etc (added this  2 /11/ 2021) ]

Wednesday, September 12, 2007

Post BMM convention 2007

Used to have another blog still have it private, copy pasted from it:-
(Note to self) 

Well it’s been couple months since the event happened, but didn’t get much time to put it to words. It was Marathi people convention involving people from all over USA and India. For past couple years the prep work was going on for this event and finally all our sweat equity was worth while. The event was Great , really well appreciated and done…

Some personal highlights would be:-

Got the opportunity of becoming Master of ceremony on the main stage for the first day of the event (capacity 3000 audience) for entire afternoon session and on the mini theater for next two days (capacity 1200 audience) afternoon sessions & morning. It was nice experience and feedback received was very encouraging and got many compliments actually from experts in this field too… Well have given speech for people but not something this real time and among all odds major being very dim lighting for podium for reading. Had done plenty stage things when  was vice president and otherwise ( antakshri hosting vaibhav ekbote will rem that well, vadyavrunda mc and things , shwass movie.. list of things done when was on committee and introduced many new concepts ) It’s prior experiences (given i had my own business & stage ability school college times , otherwise etc ) which makes U able to handle such situations swiftly when very small or no help is available, but one person really came through during this !!!!!!! thnx….

Being on the programming committee in one of lead role along with jyoti tai and sucheta & had kind of nice things from them too. There were plenty others and interactions with them taught each time new thing. Also headed the Talent transfer ekankika competition event from our side for which went all the way to Chicago to encourage participants & getting them to convention and met many well known people like , Dr. mohan agashe, alankar joshi, pallavi ranade. The journey for the competitions was something new too, working with people who have accomplished so much in their lives and weekly concalls with them for a year, so much learning opportunity. Even being person without that aura was never made to feel that way. (in the past did do vice presidency of Marathi mandal and editorship of magazines for two year….) The hospitality at Chicago mandal was awesome and two lines on stage were received very well. The encouragement from dignitaries was real thing and thanks to ashish chaughule and others for that.

Well to add to it also got chance to perform in drama in opening ceremony on main stage (though two lines &  they did come in at last minute), which was added bonus. It was after long time that I performed on stage in drama, was very active in the past & had participated in fashion shows, drama, dances in school /college time, was wonderful to re-live memory.

The original theme “he bandha reshamache…” I suggested didn’t make it to the convention theme but did make it to the program on the minimee. The explanation and the moral behind the theme got much appreciation. thanks

Overall re-discovered many lost aspects of my personality: - writing, performing, presenting etc.  added extra including conflict management, team building, many other things..
Thanks to all. It was all collective efforts for the success.







Friday, September 7, 2007

व्यक्ती

माणसं ओळ्ख्णं हे एक 'स्कील' आहे; सगळ्यांनाच ते जमतं अशातला भाग नाही कदाचित म्हणूनच 'काश मला याचा स्वभाव आधी कळला असता तर... मी अमुक अमुक गोष्ट याच्याबरोबर केली नसती' अशी वाक्यं वारंवार आपल्या कानावर पडतात.
या मागची कहाणी साधारण सारखीच असते. दोन व्यक्ती जवळ येतात, त्यांचे विचार जुळ्तात, काहीतरी एकत्र करुया असं ठरतं, केलेलं काम यशस्वी होतं आणि मग ठिणगी पडते. या मागची कारणं काहीही असतील.......म्हणजे काम करताना एखादा दुसरयापेक्षा जास्त हुशार आहे असा अनुभव येतो; मग त्याला वाटतं की काम तर मीच केलं मग फुकटच क्रेडिट घ्यायला हा कशाला? किंवा कोणीतरी तिसरच गोष्टिसारखं दोन माकडांच्या भांडणाचा फायदा घ्यायला येतं, खुप जास्त पैसे मिळ्तात आणि स्वभाव फिरतात...म्हणजेच काहितरि आपल्या मनासारखं झालं नाही की अशी हळ्ह्ळ व्यक्त करणारी माण्सं दिसून येतात.
कदाचित परिस्थितीनुसार हे सर्व विचार चूकही नसतील. जेंव्हा जेंव्हा कोणत्याही गोष्टिला फायदा किंवा नुकसान जडतं तेंव्हा तेंव्हा अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते. पण याचं रुपांतर कुटिल कारस्थान गडण्यात झालं की मग सारासार विचार करण्याची क्षमता संपते आणि आपण खूप खालच्या पातळीवर येतो. हेच एक टाळ्णं अतिमहत्वाचं!
 
[added 2/11/2021 : many such fill ins in Sa.na. vi. vi seattle mm magazines] mostly situational, based on thing happening that time around  and when U design entire thing ... apart form your articles, writing peoples sent articles, and other design etc things .... more is in Reflections blog "experession-within"]