२००८ .....
ओळखिचे अनोळखि..
ओळखिचे अनोळखि..
वॉक घेण हे आजकाल फॅड झालं आहे॰
काही जण वैदय़कीय सल्य़ामुळे तर काही आपलं आणि आपल्य़ा पार्टनरच अंडरस्टँडींग वाढाव यासाठी
तर काही हिंदी सिनेमे बघुन उत्साहीत झालेले दिसतात. पण फॅशनमुळे का होईना थोडस स्वतःसाठी
काहीतरी चांगल केलं जात.
कारण
कोणतहि असलं तरीही एका त्रयस्थ दृष्टीकोनातून हे सगळं पाहताना गंमत वाटते.
एक परीक्षण
--
म्हणजे कायॽ
गोष्ट सांगायची झाली तर सुरवातीला खुप हौशीने वॉकला जाऊयात असे ठरवून एका रीव्हर टे्लवर जाण चालु केलं.
गोष्ट सांगायची झाली तर सुरवातीला खुप हौशीने वॉकला जाऊयात असे ठरवून एका रीव्हर टे्लवर जाण चालु केलं.
आपण ---
सगळच् नवीन ---
वॉकला जाणं...
इतका
वेळ कोणत्यातरी विषयावर बोलणं...
लोकं
जी दिसतात...
नैसर्गिक
सौंदर्य...
चाललेले
अंतर...
लागलेला
दम...
नंतर
घरी जाऊन जेवण बनवण्याचा आलेला कंटाळा आणि त्यामुळे ऑर्डर केलेले जेवण...
दुस-या दिवशी दिसलेला नवीन उत्साह (ऑर्डर केलेले
जेवण हे कारण नसावं) ...
सुरवातीचे काही वॉक हे निसर्गसौंदर्य
आणि आजुबाजूची घरे पाहण्यात म्हणजे नदि‚ झाडे‚ ससे‚ कधीतरी साप‚ किडे डास‚ बदकं‚ बगळे
बघण्यात गेले॰ बाजूचे गवत खूप वाढले आहे‚ आता झाडांना फुलं आली आहेत आणि फळही लवकरच
येतील॰ हे चेरीचे झाड आहे असे वाटते‚ पक्षी खूप छान आवाज करत आहेत‚ हा रस्ता किती लांब
जातो‚ ही नवीन घरांची कॉलनी कुठेशी आहे वगैरे...
जाता येताना काही लोक दिसायची
पण ऐवढच एक समाधान होत की ओळख नसली तरी रस्त्यावर आपण सोडून कोणीतरी आहे.
मग हळूहळू निसर्ग संपत्ती संपल्यावर आजू बाजूची लोक
बघण्यास सुरुवात झाली, त्यात मग हिचे कपडे कसे आहेत, तो बघ कसा चालतो, त्याचे बूट कोणत्या कंपनीचे आहेत, हि पुढे बघितलेली लोक किती विरुद्ध आहेत त्यातल्या त्यात सुधृड वयक्तीच्या हातात छोटा कुत्रा आणि लुक्कड च्या हातात मोठाला कुत्रा (त्याच्यावर वेळ अशी आली कि तो कुत्र्याला फिरवतोय कि कुत्रा त्याला हा प्रश्न आपल्याला ), ह्या बाईनी तिच्या कुत्र्याची "शी" उचलली
नाही.
मग स्लीम ट्रिम मुली पळताना (ह्यांना आता आजून किती
स्लीम व्हायचं आहे हा प्रश्न) आणि मग
क्षणिक आपला परीक्षण कि आपल्याला अजुन दिल्ही खूप दूर आहे हि जाणीव (कधी जाणार हे खाल्लेले idaho बटाटे आणि cheese ) ... गेट motivated ..................गेट motivated
....असं म्हणून चालण्याचा जोर वाढवणे ....
मग मधेच ह्या ट्रेल वर देसी खूप आहेत हे निरीक्षण
... दोन देसी माणसं एकमेकांना दिसली कि पहिले म्हणजे आपले कपडे तिच्या पेक्ष्या बरे आहेत कि नाहीत हे पाहणं, ते पाहताना नवऱ्याला complain करण कि
मला असा top हवा आहे आता या इंडिया ट्रिपला घेवू..
मग आपण बघितलच नाही असं वागणं ... हे अगदि noticeable
असतं... कधीकधी न केलेलं
संभाषण हे बघण्यासारखं असतं .. असो !!
आपल्यातला बदल
:-
कपडे थोडे change
झाले.... घाम न
येणारे आणि कमी थंडी वाजेल असे
बूट नवीन घेतले ... चालायला उपयुक्त
कमरेचा बेल्ट घेतल्यामुळे पाण्याची बाटली कोणी धरायची हि कटकट गेली आणि थोडेसे खाणे हि त्यात ठेवता येते त्यामुळे
तू खूप लांब गेलास आणि मला भूक लागली वगैरे तत्सम भांडणे टळली
बरेच लोक show dog घेवून चालताना दिसायचे, मग
हळूहळू मालक आणि त्याचा कुत्रा
हे लक्ष्यात राहू लागलं...
एक जण तर दर अर्ध्या
तासांनी त्याच्या कुत्र्याला चालायला न्यायाचा. तो
कुत्रा घोड्याच्या चालींनी चालायचा . show करून करून
कुत्र्याला चाल पण विसरली होती.
बाकीचे कुत्रेवाले ---
काही काही कुत्रे खूप groomed
म्हणजे manicure केलेले
पण असतील ... season बदलला त्या प्रमाणे त्यांचे कपडेही... कुत्रे
कपडे घालतात हा
जरा नवीन concept वाटला ..
एका बाईचा कुत्रा तर मोजे घालून आणि कानटोपी घालून
चालत होता (तो घसरत होता
snow वरून, त्याला
हि वाटत असेल का हे अत्याचार माझ्यावर )... असं काही बघण्याची सवय नसल्यामुळे किंवा दुसऱ्याच्या भावना न
कळल्यामुळे पहिली प्रतिक्रिया हि हसण्याची असायची .. पण
मालक समोर हसता येत नाही म्हणून "दाबून दाबून" हसणे किती कठीण असते हे तेंवा समजले.😊
आता तर कोणत्यावेळी कोण
कुत्रेवला कुठे भेटला पाहिजे या पर्यंत मजल गेली आहे... mile post आमुक च्या
इथे हा माणूस दिसेल किंवा आता आपल्याला हा कुत्रेवला क्रॉस करेल वगैरे...
एका दिवशी mile post बदलला कि आपण उशिरा आलो कि लवकर ते हि कळते.
ते हि असच काही म्हणत असतील...
who knows
मजल थोडे smile , hello , गुड मोर्निंग म्हणण्या पर्यंत
गेली आहे .. म्हणजे ते हि आपला काहीसा reference ठेवत असणार असे कळते . म्हणजे
:- आज हि दोघं दिसली नाहीत .. हि आता थोडी बारीक वाटते वगैरे
...
असे हे ओळखीचे अनोळखी
...
तेवढाच एक दिलासा असतो एका वेगळ्या देशात .... आपल्याला पण कोणीतरी ओळखत...
आपल्यातला बदल :-
सुरुवातीचा walk
हा आता मी walk आणि
हा walk other day यात तफदील झाला आहे ..
प्रश्न हा कि आता बोलणार कोणत्या विषयावर सारखं सारखं आणि दोन तास ???
थोडे दिवसांनी मलाही
कुत्रा घेतलेला कोणी पाहिलं तर नवल नाही😁
हे होण्याच्या आधी ....
आता नवीन उपक्रम म्हणजे
नवीन ट्रेल शोधणे आणि पुन:च्छ "हरी ओम"
करणे😁
कीप healthy , कीप smiling , कीप walking...... (written in 2008 )